अहिल्यानगर : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करून तिचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत डोंगरगण रस्ता, लॉजवर नेवून बळजबरीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच तरुणीचे जमलेले लग्न मोडले.
याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल पद्माकर दरंदले (वय ३७, रा. कॉलेज सोनई, अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईक लग्नासाठी स्थळ पाहत असताना राहुल दरंदले व त्याचे नातेवाईक पाहण्यासाठी आले होते. मात्र, अन्य लोकांकडे चौकशी केली असता राहुल याचे अगोदर लग्न झाल्याचे समजले. त्यामुळे आम्ही लग्नास नकार दिला.
मात्र, त्यानंतर आई-वडील घरी नसताना राहुल आमच्या घरी आला. त्याने बळजबरीने अत्याचार केला आणि नन्न फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी केली. त्याला गुगल पे, फोन पे द्वारे ३० हजार रुपये दिले. त्यानंतर त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत डोंगरगण रस्ता व एका हॉटेलमधील लॉजवर नेवून अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.