Nagpur News : नागपूर : पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा कळमेश्वर नगर परिषदेच्या जलतरण तलावात
बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.३१) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Doctor who went for swimming training drowned in swimming pool)
राकेश दुधे ( वय- ४१, रा. कळमेश्वर) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे.
कळमेश्वर नगर परिषदेच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. दुधे यांचे कळमेश्वर स्टेशन रोडवर श्री हॉस्पिटल आहे. ते नेहमीप्रमाणे सायंकाळी सहा वाजता पोहायला गेले होते. (Nagpur News) बुधवारी ते पोहायला गेले असता त्यांचा तोल गेला आणि पाण्यात पडले. त्यांच्या नाकातोंडातून पाणी गेले होते. आणि पाण्यातच ते बेशुध्द झाले.
त्यानंतर राकेश दुधे यांना तात्काळ जवळच असलेल्या कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अधिक तपास कळमेश्वर पोलिस करीत आहेत.
दरम्यान, तीन वर्षे बंद असलेल्या या जलतरण केंद्राचा नुकताच मार्च २३ ला शुभारंभ करण्यात आला होता. येथील कंत्राटदाराने पैसे घेऊनही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध न केल्याने आज एका तरुण डॉक्टरचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. (Nagpur News) पालिकेने संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करून कंत्राटदाराविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शहर भाजप महामंत्री प्रशांत इखार यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagpur Crime : कारची दुचाकीला जोरदार धडक ; धडकेत दुचाकीवरील चौघांचा जागेवरच मृत्यू…!
JOB : नागपूर मेट्रो मध्ये नोकरीची संधी; त्वरित ऑनलाईन अर्ज करा…!