Mumbai News : मुंबई : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असतानाही विधानसभेत सुनावणीच्या कामकाजात वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात शिंदे गटाकडून आता कागदपत्रे मागवून घेतली आहेत. वरून आलेल्या सूचनांचे येथे पालन केले जात आहे. अशा बेकायदेशीर गोष्टींना खतपाणी घालण्याचा हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, असे म्हणत अॅड. असिम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कडाडून टीका केली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कडाडून टीका
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी आज संपली. शिंदे गटाला कागदपत्रांसाठी एक आठवड्याची वेळ दिली आहे. त्यानंतर प्रतिक्रीया देताना ठाकरे गटाचे वकील अॅड. असिम सरोदे म्हणाले की, या संबंधित एकाच विषयावरील ४० याचिका विधानसभा अध्यक्षांसमोर असून, सर्व याचिकांवर एकत्रित निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. सर्व याचिका या एकत्रितपणे चालवण्यात याव्यात. (Mumbai News) कारण सगळ्या याचिकांतून एकच मागणी केली आहे. काहीजण पक्षाचा आदेश झुगारून बाहेर पडले आहेत. त्या लोकांना सर्वोच्च न्यायालयाने आधीच अपात्र ठरवले आहे. आता राहुल नार्वेकरांनी वेळ मारून नेऊ नये.
दरम्यान, आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय आठवड्यानंतर होणार आहे. आजच्या सुनावणीनंतर नार्वेकर यांनी एक आठवड्याची मुदत दिली आहे. (Mumbai News) शिंदे गटाने कागदपत्रांची मागणी करत दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, अध्यक्षांनी तूर्तास तरी दोन्ही गटांना आठवड्याचा अवधी दिला आहे.
आजच्या सुनावणीला दोन्ही गटाच्या आमदारांना प्रत्यक्ष विधानभवनात हजर राहण्याच्या सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्या होत्या. या सुनावणीला शिंदे गटाचे २१ तर ठाकरे गटाचे १४ आमदार उपस्थित होते. सर्व याचिका स्वतंत्र आहेत, त्यामुळे या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी होईल, असे नार्वेकर सुनावणीदरम्यान म्हणाले. (Mumbai News) शिंदे गटाकडून निहार ठाकरे तर ठाकरे गटाकडून देवदत कामत यांनी युक्तिवाद केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News :’जागर पदयात्रा संयमाने काढली हा इशारा, नाहीतर…’; अमित ठाकरे आक्रमक
Mumbai News : पुण्याच्या आनंदचा संघर्ष ऐकून KBC च्या सेटवर बच्चनही झाले भावुक…