Tuesday, May 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नाच्या खर्चाला फाटा! नांदेडच्या पेठकर नवदाम्पत्याने गावकऱ्यांना दिलं 33 कोटींचं ‘रिटर्न गिफ्ट’; संपूर्ण गावाचा काढला विमा!

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 26 May 2026, 19:54

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील एका विवाह सोहळ्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे, कारण या लग्नात डिझेल-डीजे किंवा रोषणाईवर अवाजवी खर्च न करता थेट समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील पेठकर कुटुंबाने एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. 20 मे रोजी झालेल्या सिद्धेश्वर पेठकर आणि मंजुषा यांच्या विवाहानिमित्त, या परिवाराने गावातील तब्बल 3,465 नागरिकांचा प्रत्येकी 1 लाख रुपयांचा अपघात विमा स्वतःच्या खिशातून उतरवला आहे. यामुळे संपूर्ण गावाला एकाच वेळी तब्बल 33.6 कोटी रुपयांचे भव्य सामूहिक सुरक्षा कवच मिळाले आहे.

या कुटुंबाला सामाजिक कामाची आवड असून त्यांनी हा कौतुकास्पद वारसा पुढे सुरू ठेवला आहे. याआधी अनूप पेठकर यांनी स्वतःच्या लग्नामध्ये उपस्थित वऱ्हाड्यांना हेल्मेटचे वाटप केले होते, तसेच 900 लोकांना विमा आणि हेल्मेट देण्याचा एक विशेष कॅम्पही चालवला होता. आता घरातील लहान भावाच्या लग्नाचे औचित्य साधून त्यांनी थेट पूर्ण गावाचाच विमा काढण्याचा मोठा निर्णय घेतला. या अनोख्या भेटीबद्दल नववधू मंजुषा हिने देखील अत्यंत भावूक होत आनंद व्यक्त केला असून, लग्नाच्या निमित्ताने गावकऱ्यांसाठी काहीतरी चांगले करता आले याचा सार्थ अभिमान असल्याचे तिने सांगितले.

 

विमा प्रक्रियेत गावातील एकाही पात्र व्यक्तीचे नाव सुटू नये म्हणून पेठकर कुटुंबाने बहादरपुरा ग्रामपंचायतीची अधिकृत मतदार यादीच थेट विमा कंपनीकडे सोपवली होती. त्यामुळे कोणत्याही गावकऱ्याला कागदपत्रे गोळा करण्याचा किंवा फॉर्म भरण्याचा त्रास झाला नाही आणि सर्वांचा ‘ग्रुप अ‍ॅक्सिडेंट इन्शुरन्स’ घरबसल्या तयार झाला. ही विमा पॉलिसी पुढील 1 वर्षासाठी लागू असेल, ज्यामध्ये कोणत्याही अपघाती मृत्यूच्या प्रसंगी संबंधित कुटुंबाला 1 लाख रुपयांची तातडीची मदत दिली जाईल. या उपक्रमासाठी मोठा निधी खर्च झाला असला तरी पेठकर परिवाराने खर्चाचा आकडा सांगण्यास नकार दिला आहे. दरम्यान, अनेकजण या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करत आहेत.  

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बाप रे! बनावट सोनं ठेवून HDFC बँकेला 18 लाखांचा चुना, रांजणगावमधील धक्कादायक प्रकार; 12 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 26 May 2026, 21:17

पुणे-सातारा हायवेवर खळबळ! भोरजवळ संशयास्पद उभ्या असलेल्या ‘स्विफ्ट कार’मध्ये आढळला मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Tuesday, 26 May 2026, 21:01

जागावाटपाचा सस्पेन्स कायम! पुण्याच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने; पाहा कुठे कुणाची किती ताकद

Tuesday, 26 May 2026, 20:55

लग्नाच्या खर्चाला फाटा! नांदेडच्या पेठकर नवदाम्पत्याने गावकऱ्यांना दिलं 33 कोटींचं ‘रिटर्न गिफ्ट’; संपूर्ण गावाचा काढला विमा!

Tuesday, 26 May 2026, 19:54

रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदी! एका चुकीच्या निर्णयामुळे धुरंधरचं करिअर धोक्यात? जाणून घ्या नेमकं कारण?

Tuesday, 26 May 2026, 19:32

शासकीय नोकरीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या रॅकेटचा बारामती पोलिसांकडून पर्दाफाश; टोळीतील आरोपी जेरबंद

Tuesday, 26 May 2026, 18:25
Next Post

जागावाटपाचा सस्पेन्स कायम! पुण्याच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने; पाहा कुठे कुणाची किती ताकद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.