Pune Prime News : जायकवाडी पाणी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला असून मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरून सध्या जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
या सुनावणीत उत्तर महाराष्ट्रातून आता मराठवाड्याला पाणी सोडलं जाणार, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थिगिती नाकारली असून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राखला आहे.
मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी पद्मसिंह विखे पाटील साखर कारखाना, संजीवनी सहकारी साखर कारखान्याने 30 ऑक्टोबरच्या आदेशाला स्थिगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयात जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशावर सुनावणी पार पडली. यामध्ये सुप्रीम कोर्टाने जलसंपदा विभागाने दिलेल्या ३० ऑक्टोंबरच्या निर्णयाचे पालन करुन सर्वोच्च न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करु शकत नसल्याचे म्हणले आहे. (Supreme Court)
नेमकं काय म्हणालं कोर्ट ?
या प्रकरणाबाबत बोलताना वकील युवराज काकडे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदारांनी मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध केला होता. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. राज्य सरकार पाणी सोडू शकते. नगर आणि नाशिक कारखानदारांनी पाणी सोडू नये असं नगर जिल्ह्यातील कारखानदारांचं म्हणंण होतं.