लातूर : राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी जोरदारपणे आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. अशातच निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. अनेक जिल्ह्यांत जाण्यासाठी ते हेलिकॉप्टरचा वापर करत जात आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या सामानाची तपासणी केली जात आहे. काल सोमवारी (दि.11 नोव्हेंबर) त्यांची वणी येथे बॅग तपासल्यानंतर आज मंगळवारी औसा येथे त्यांच्या सामानाची तापसणी करण्यात आली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांचीच उलटतपासणी केली.
या घटनेवर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. तसेच, त्यांचे आयडी आणि अपॉईंटमेंट लेटरही दाखवण्यास सांगितलं. या घटनेचा व्हिडिओ स्वत: उद्धव ठाकरेंनी शुट केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महाविकास आघाडीचे औसा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला जाताना उद्धव ठाकरे यांच्या सामानांची झाडाझडती घेण्यात आली. उद्धव ठाकरेंनीही सामानाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यांचं नाव, त्यांचं नियुक्त पत्रक, एवढंच नव्हे तर त्यांच्या खिशातील पाकिटात किती पैसे आहेत, याचीही विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी आले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, आत्तापर्यंत किती जणांची बॅग तपासली असा सवाल संबंधितांना केला. त्यावर, तुम्हीच पहिले आहात असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले असता, दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक का, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ स्वत:च शुट केला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅगा तपासण्याचंही आव्हान या तपासणी करणा-या अधिकाऱ्यांना दिलं. ते म्हणाले, आज मोदी सोलापुरात येत आहेत. ओडिशात त्यांची बॅग तपासली म्हणून अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं होतं. त्यामुळे माझी तपासणी होत असेल तर मोदींचीही तपासणी झाली पाहिजे, ही माझी जाहीरसभेतील आजची मागणी आहे. मला जो न्याय लागतो, तो मोदींनाही लागला पाहिजे.” बॅग तपासत असताना उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले, बॅगा तुमच्याकडेच ठेवा. हवंतर माझ्या पुढच्या मुक्कामी या बॅगा घेऊन या, असंही ते म्हणाले. तसंच, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला काही होणार नाही, असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना दिलासाही दिला.
While the Entirely Compromised commission shamelessly carries on trying to delay Uddhav Thackeray ji to his sabhas by frisking, the question is, why isn’t the PM or other ministers visiting Maharashtra to promote bjp’s loot being frisked this way?
What a disgrace it’s turning… https://t.co/PxPKKsPhTu
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 12, 2024