छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर एका भीषण अपघाताने हादरलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळुज एमआयडीसी परिसरात हिट अँड रनची घटना घडली असून यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाहन परवाना नसतानाही दारू पिऊन भरधाव गाडी चालवत स्कॉर्पिओने कारला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात भीषण अपघातांच्या बातम्या ऐकू यते आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून ड्रंक अँड ड्राईव्हची भयंकर घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळुज एमआयडीसी परिसरात हा अपघात झाला असून यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाहन परवाना नसतानाही दारू पिऊन भरधाव गाडी चालवत स्कॉर्पिओने कारला जोराची धडक दिली. या या अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
बारशाचा कार्यक्रम आटोपून परतताना अपघात..
कारमधील कुटुंब हे बारशाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवण्यास दिल्याचे आता समोर आले आहे. विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय 22 वर्ष, रा.बकवाल नगर वाळूज ता.गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर) आणि कृष्णा कारभारी केरे (वय 19 वर्ष) राहणार बकवाल नगर वाळूज तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.