परळी: बीड जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. येथील परळी शहरात गाईंना गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र परिसरातील जागरूक नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये दोन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता या प्रकरणात राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांना संशयितांचा शोध घेण्यास सांगितले होते. याबाबत परळी शहर पोलीस ठाण्यात दत्तात्रय दुनदुलेयांनी फिर्याद दिली आहे.
परळी शहरातील स्नेह नगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास गाईंना वेगवेगळ्या पदार्थातुन गुंगीचे औषध खाऊ घालून त्यांना पळून नेण्याचा अज्ञात प्रयत्न करत होते. हा धक्कादायक प्रकार परिसरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला. त्यानंतर चोरटे तेथून पळून गेले. ज्या गाईंनी गुंगीचे औषध दिले होते. त्या गाईंना हालचालही करता येत नव्हती. त्यानंतर गाईवर उपचार करण्यात आले.
याबाबत आता, राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड पोलीस प्रशासनाला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आता या प्रकरणी गाईंना गुंगीचे औषध देणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.