छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील बिडकी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या मंडळीनी सातत्याने माहेरहून वाहन खरेदी करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करत होते. या त्रासाला कंटाळून साडेचार महिन्याची गर्भवती महिलेने गळफास घेत जीवन संपवले.
साधना किरण नरवडे (वय-25) असे मृत विवाहीत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साधना नरवडे यांचे लग्न झाल्यानंतर संसाराला सुरवात झाली. त्यानंतर त्यांच्या सासरची मंडळीनी वारंवार गाडी घेण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये आणायला तगादा लावत होते. यासाठी होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाच्या त्रासाला कंटाळून साधनाने टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली. आत्महत्येवळी साधना नरवडे या गर्भवती होत्या. राहत्या घरातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जीवन संपवले.
या प्रकरणी साधना नरवडेच्या पतीसह सासरच्या पाच जणांवर बिडकीन पोलीस गाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पती, सासू आणि सासरा या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.