Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 “टीकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा कृतीतून उत्तर देणे गरजेचे..” अभिनेत्री सीमा बिस्वा 

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 18 January 2025, 16:26

छत्रपती संभाजीनगर : आपल्यावर होणाऱ्या टीकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा आपण आपले काम करत राहिले पाहिजे. मी माझे काम उत्तम आणि दर्जेदारपणे करत मला मिळालेल्या प्रत्येक भूमेकेला न्याय देत आजवरचा सिनेप्रवास केला असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी यावेळी केले.

 

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री आणि दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय सिनेमा स्पर्धेच्या ज्यूरी पर्सन सीमा बिस्वास यांच्याशी प्रा. शिव कदम यांनी आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे मास्टर क्लासमध्ये संवाद साधला.

पुढे बोलताना बिस्वास म्हणाल्या, मला एक प्रतिभाशाली नृत्यांगना व्हायचे होते, मात्र पहिल्यांदा अभिनय केला आणि मला लक्षात आले की, अभिनय हीच गोष्ट आहे जी आपल्याला पुढे करायची आहे. माझा प्रवास मलाच प्रेरक वाटतो, कारण एका छोट्या गावातून सुरू झालेला माझा प्रवास ऑस्करपर्यंत जाऊन पोहचला आहे.

म्हणून मी ‘खामोशी’ हा चित्रपट केला

‘बॅन्डिट क्वीन’ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी ३ दिवस झोपले नव्हते. आणि मी या विचारावर आले की, ही भूमिका केवळ मीच करू शकते. आणि या चित्रपटात काम करण्याचा अनुभव हा आयुष्यभर लक्षात राहील, असा होता. ‘बॅन्डिट क्वीन’नंतर मला स्वत:ला मी एक वादग्रस्त अभिनेत्री नसून अभिनेत्री आहे, हे सिद्ध करायचे होते म्हणून मी ‘खामोशी’ हा चित्रपट केला असल्याचे अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी सांगितले.

पुढे बोलताना अभिनेत्री सीमा बिस्वास म्हणाल्या, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मी कायम सांगत आले आहे की, आपण कोणतीही भूमिका करीत असताना आपली भूमिका प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. आपण चित्रपटातील भूमिकांमधून प्रेरणा घ्यायला पाहिजे, त्यांना आपण कॉपी केले नाही पाहिजे. कॉपी केल्यामुळे मूळ भूमिकेतील आत्मा नष्ट होतो. आपण भूमिका करण्याच्या प्रक्रियेतून जात असताना त्या संबंधित भूमिकेला न्याय देत ती भूमिका जगली पाहिजे. मी आजपर्यंत ज्या भूमिका केल्या त्या प्रत्येक भूमिकेत स्वत:ला पूर्णपणे गुंतवून ठेवत २४ तास संबंधित भूमिकेचे जीवन जगत मी चित्रपट केले. विशेषत: प्रत्येक काम करत असताना मी शून्यापासून सुरू करत असते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
Youth committed suicide at sant tukaram metro station pune

भेळच्या दुकानात गळफास घेत युवकाची आत्महत्या; परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.