छत्रपती संभाजीनगर: येथे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, पोलिसांनी माजी मंत्री आणि आमदार राजेश टोपे यांच्यासह 50 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. सकाळी 11 वाजल्यापासून जालना रोडवर हे आंदोलन सुरु होते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा लक्षात घेत पोलिसांनी यापूर्वीच माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर आता साडेचार तासांनी पोलिसांनी आमदार राजेश टोपे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह एकूण 50 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.