Sunday, August 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“आपण दोघे राहू, तुझ्या बाबांना सोडून देते, आत्ता मंगळसूत्र काढून फेकते!” आईची अखेरची विनवणी; मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, हादरवून टाकणारं कारण आलं समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 22 August 2026, 8:22

छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेने छत्रपती संभाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही जीव गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एका कुटुंबावर क्षणात मोठे संकट कोसळले.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील धनगर पिंपळवाडी येथील चांदगुडे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून शहरात राहत होते. त्यांचा मुलगा कुणाल हा अभ्यासात हुशार होता. त्याने दहावीच्या परीक्षेत 92 टक्के गुण मिळवले होते आणि पुढे डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न होते. नुकताच त्याने अकरावीमध्ये प्रवेश घेतला होता.

मात्र काही दिवसांपासून कुणाल आणि त्याच्या वडिलांमध्ये काही कारणांवरून मतभेद सुरू होते. आर्थिक बाबी, मोबाईलच्या हप्त्यांसह इतर कौटुंबिक विषयांमुळे तो मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे. याच परिस्थितीत तो खवड्या डोंगरावर गेला. त्याची मानसिक अवस्था लक्षात आल्यानंतर आई-वडिलांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

आईने मुलाला शांत करण्यासाठी भावनिक विनवणी केली आणि घरी परतण्याची विनंती केली. “तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आत्ता मंगळसूत्र काढून फेकते. तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते. आपण दोघे राहू, पण मला सोडून जाऊ नकोस…” असे आईने सांगितले.

 

दरम्यान, चांदगुडे कुटुंबावर यापूर्वीही मोठा आघात झाला होता. सुमारे सहा वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर घरातील वातावरण तणावपूर्ण राहू लागल्याचे सांगितले जाते. वडील ट्रकचालक असल्याने कामानिमित्त त्यांना बराच काळ घरापासून दूर राहावे लागत होते. दरम्यान, तब्बल तीन महिन्यांनंतर वडील घरी परतले होते. त्यानंतर पुन्हा घरात वाद सुरू झाले आणि मागील दोन दिवसांपासून कुटुंबात सतत खटके उडत असल्याचे समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कुणालचे वडिलांसोबत काही दिवसांपासून मतभेद सुरू होते. खर्चासाठी घरी पैसे न पाठवणे आणि आयफोनच्या हप्त्यांचा आर्थिक ताण या गोष्टींमुळे तो अस्वस्थ झाल्याचे सांगितले जाते. याच तणावाच्या परिस्थितीत तो खवड्या डोंगरावर पोहोचला. डोंगराच्या कठड्याजवळ गेल्यानंतर त्याने आपला आयफोन, हातातील घड्याळ आणि गळ्यातील चांदीची साखळी काढून खाली फेकली. त्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली. त्याने आई-वडिलांचे म्हणणे ऐकले नाही आणि मुलाने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडीलही दरीत कोसळले. या दुर्घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कार्यवाही सुरू केली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिरूर तालुक्यात खळबळ; नोकरीचे आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार,सात जणांवर गुन्हा दाखल…..

Saturday, 22 August 2026, 21:20

कापूरहोळ चौकात 23 ऑगस्टला रास्ता रोको! पुणे-सातारा महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार

Saturday, 22 August 2026, 21:08

शाळेत एंट्री भोवली! लातूरमध्ये अभिजीत दिपकेंसह समर्थकांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Saturday, 22 August 2026, 20:17

पदपथ झाले दुकानांचे, रस्ते झाले पार्किंगचे; पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर! अतिक्रमणांवर धडक कारवाईची नागरिकांची मागणी -डॉ. अशोक बालगुडे

Saturday, 22 August 2026, 19:25

बापरे… माय-लेकाचे मृतदेह एकाच घरात ; बारामती तालुक्यातील तांदुळवाडी गावातील दुर्घटना

Saturday, 22 August 2026, 19:05

मांजरीत डंपरची दुचाकीला धडक; चाकाखाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Saturday, 22 August 2026, 18:50
Next Post

इनामगाव परिसरात दोन वर्षांपासून दहशत माजवणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद! नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp