लोणी काळभोर : मांजरी–महादेवनगर–मांजरी रस्त्यावर डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण डंपरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. अमीत रमेश अवताडे (वय 22, रा. गोपाळपट्टी, मांजरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास मोंटा मार्टसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. डंपर मांजरीच्या दिशेने जात असताना अमीतही दुचाकीवरून त्याच दिशेने जात होता. त्यावेळी दुचाकीला डंपरचा धक्का लागल्याने अमीत खाली पडला आणि डंपरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मांजरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.








