Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळेत एंट्री भोवली! लातूरमध्ये अभिजीत दिपकेंसह समर्थकांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 22 August 2026, 20:17

लातूर : दिल्लीतील आंदोलनाच्या यशानंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके महाराष्ट्रातील विविध सरकारी शाळांमधील गैरसोयी समोर आणण्याचे काम सध्या करत आहेत. मात्र, 20 ऑगस्ट रोजी त्यांनी लातूर जिल्ह्यात घेतलेली भेट आता एका नव्या वादात सापडली आहे. औसा शहरातील जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अभिजीत दिपके यांच्यासह पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते अजिंक्य शिंदे आणि इतर 4 ते 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेतील शिक्षिका सय्यद समशाद बानो खैरात अली (वय 53) यांनी औसा पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, 20 ऑगस्ट रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत प्रवेश केला. त्यांनी वर्गखोल्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले, ज्यामुळे अध्यापनात आणि शासकीय कामात थेट व्यत्यय निर्माण झाला.

याशिवाय, शाळेची बदनामी करण्याच्या उद्देशाने इतर शाळेतील विद्यार्थ्यांना येथे बसवण्यात आल्याचा खोटा आरोप करण्यात आला. तसेच शिक्षकांना आक्षेपार्ह भाषा वापरून ‘तुम्हाला निलंबित करायला लावतो’ अशी धमकी दिल्याचा उल्लेखही तक्रारीत आहे. या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण (व्हिडिओ) करून ते सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आले.

या घटनेप्रकरणी औसा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 132, 329(3), 351(2), 356(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

दरम्यान, या दौऱ्यादरम्यान अभिजीत दिपके यांनी शाळेतील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची अवस्था आणि मूलभूत सुविधांच्या अभावावरून प्रशासनाला सवाल केले होते. तसेच त्यांनी मुख्याध्यापकांनाही याबाबत जाब विचारला होता. मात्र, पूर्वपरवानगी न घेता प्रवेश करणे आणि कामात अडथळा निर्माण करणे या आरोपांमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

कापूरहोळ चौकात 23 ऑगस्टला रास्ता रोको! पुणे-सातारा महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp