Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पदपथ झाले दुकानांचे, रस्ते झाले पार्किंगचे; पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर! अतिक्रमणांवर धडक कारवाईची नागरिकांची मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 23 August 2026, 8:59

डॉ. अशोक बालगुडे

पुणे : हडपसरसह पूर्व हवेलीचा झपाट्याने झालेला विकास, अपुरे पर्यायी रस्ते, अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक नियमांची उघडपणे होणारी पायमल्ली यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांसह रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे अतिक्रमणांवर धडक कारवाई करून रस्ते आणि पदपथ मोकळे करण्याची मागणी नागरिक व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

हडपसर वाहतूक विभागाच्या वतीने शुक्रवारी (ता. 21) रस्ता सुरक्षा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत वाहतूक कोंडीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. काही मार्ग एकेरी करणे, शाळा-महाविद्यालय परिसर ‘नो हॉकर्स’ व ‘नो पार्किंग’ झोन करणे, तसेच बेशिस्त पार्किंगवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सतीश जगताप, सचिन शेवाळे, अभिजित कदम, संतोष खरात, विशाल गुजर आदी उपस्थित होते.

हडपसर प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रशांत तुपे म्हणाले, “चुकीच्या गोष्टीला कोणीही पाठीशी घालू नये. रस्ता वाहतुकीसाठी आणि पदपथ पादचाऱ्यांसाठी आहेत. ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ठोस कारवाई आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालय परिसर ‘नो हॉकर्स’ आणि ‘नो पार्किंग’ झोन करावा. स्कूल बसेस रस्त्यावर उभ्या करण्याऐवजी शाळांच्या आवारात त्यांची व्यवस्था करावी.” हडपसर भाजी मंडई व क्षेत्रीय कार्यालयाच्या जागेवर मेट्रो स्थानक, मॉल, भाजी मंडई आणि क्षेत्रीय कार्यालयाचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

दिवसातून तीन वेळा अतिक्रमण कारवाई

महापालिकेचे सहायक आयुक्त कुणालकुमार धुमाळ यांनी अतिक्रमण विभागाकडे मनुष्यबळ आणि वाहनांची कमतरता असल्याचे मान्य केले. मात्र उपलब्ध साधनसामग्रीच्या माध्यमातून दिवसातून तीन वेळा अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “अतिक्रमण कारवाईत कोणाचाही मुलाहिजा किंवा दबाव सहन केला जाणार नाही. कारवाईची माहिती आधीच अतिक्रमणधारकांना देणाऱ्या चालकाची बदली करण्यात आली आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल,” असा इशाराही धुमाळ यांनी दिला.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईची मागणी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष ईशान तुपे यांनी हडपसरचा विकास वाहतूक नियोजनापेक्षा अधिक वेगाने झाल्याचे सांगितले. नो-एंट्रीतून व विरुद्ध दिशेने धावणारी वाहने, लक्झरी बसेस, रिक्षा, दुचाकी आणि स्कूल बसेस यांच्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक केराप्पा माने यांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षा, दुचाकी, नो-एंट्रीतून येणारी वाहने, ट्रिपल सीट आणि परवान्याविना धावणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू असल्याचे सांगितले. बेशिस्त रिक्षा जप्त करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे.

मनपाचे माजी स्वीकृत सदस्य संजय शिंदे यांनी ससाणेनगरमधून बारा वाड्यांकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्यावरील अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला. सकाळ-संध्याकाळ वाहने तासनतास अडकून पडत असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तर अॅड. राहुल झेंडे यांनी लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोलनाका मार्गावरील खड्डे, रस्त्यावरील पार्किंग आणि हॉटेल्सच्या अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला. हॉटेल्सच्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. संबंधितांवर वाहतूक आणि अतिक्रमण विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, वाहतूक कोंडी ही केवळ वाहनांची समस्या नसून शहर नियोजनाच्या अपयशाचे लक्षण बनली आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याबरोबरच पदपथ, पार्किंग, स्कूल बस आणि सार्वजनिक वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन करणे गरजेचे आहे. काही दिवसांची कारवाई नको, तर सातत्यपूर्ण धडक मोहीम राबविल्यासच हडपसरची वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

शाळेत एंट्री भोवली! लातूरमध्ये अभिजीत दिपकेंसह समर्थकांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp