धाराशिव : कळंबमध्ये चार दिवसांपूर्वी सडलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी आता आरोपींकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. आरोपी रामेश्वर उर्फ राहण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद यांना अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान त्यांनी धक्कादायक खुलासा करत हत्येची कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता कळंब हत्या प्रकरणात आरोपींनी नवीन खुलासा केल्याची माहिती समोर आली आहे. कळंब येथील मृत महिला मनीषा बिडवेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातूनच झाल्याची माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींनी अटक केल्यानंतर या हत्येबाबत कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.