Jalna-Mumbai Vande Bharat: जालना : मध्य रेल्वेनं जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (वन-वे) ट्रेनचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. याशिवाय आज अयोध्येत पंतप्रधान मोदी पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करतील. यावेळी जालान-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनवरुन हिरवा झेंडा दाखवतील. नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे मराठवाड्यातून मुंबईपर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील
जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या उदघाटन सेवेचं स्थानकांवर खासदार, आमदार, पालकमंत्री, शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून भव्य स्वागत करण्यात येणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर-बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस, मंगळुरू-मडगाव (गोवा) वंदे भारत एक्सप्रेस, अयोध्या धाम-आनंद विहार टर्मिनल ( दिल्ली) वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवेल.
जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक
30 डिसेंबर 2023 रोजी 8 डब्ब्यांची वंदे भारत ट्रेन जालन्याहून सकाळी 11 वाजता रवाना होईल.
जालन्याहून रवाना झालेली ही गाडी सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी औरंगाबादला पोहोचेल.
11 वाजून 57 मिनिटांनी प्रस्थान करेल.
त्यानंतर ट्रेन मनमाड जंक्शनवर 13:42 तास/13:44 तास
नाशिकरोड – 14:44 तास/14:46 तास
कल्याण जंक्शन – 17:06 तास/17:08 तास
ठाणे – 17:28 तास/17 :30 तास
दादर – 17:50 तास/17:52 तास
सीएसएमटी मुंबई – 18:45 तास पोहोचेल पोहोचेल.