Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ससून’मधील घोळ काही संपेना! सहा महिन्यांत चौथा अधीक्षक नेमण्याचा प्रशासनाचा विक्रम

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 30 December 2023, 13:30
Dr.ajay taware appointed as superintendent of sasoon hospital

पुणे: ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षक पदाची ‘संगीत खुर्ची’ खेळ सुरू आहे. विद्यमान अधीक्षक डॉ. किरणकुमार जाधव यांना हटवून आता त्यांच्या जागी डॉ.अजय तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे गेल्या सहा महिन्यांत चौथा अधीक्षक नेमण्याचा विक्रम रुग्णालय प्रशासनाने आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे अधिष्ठातापदाचा कार्यभार डॉ.विनायक काळे यांनी स्वीकारल्यानंतर अवघ्या महिनाभरातच त्यांनी अधीक्षक बदलण्याचे पाऊल मोठे उचलले आहे.

ससूनच्या वैद्यकीय अध्यक्षपदी मे महिन्यात डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांना पदावरून हटवत डॉ. सुनील भामरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. लगेच सप्टेंबरमध्ये डॉ.किरणकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. जाधव यांनी रुग्णालयाच्या प्रशासनातील गोंधळ दूर करीत कामात सुसूत्रता आणली होती. याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांबाबत शिस्तीचे पाऊल उचलले होते. याबद्दलही अनेक जण त्यांच्यावर नाराज होते, अशी चर्चा आहे.

डॉ.अजय तावरे हे यापूर्वीही अधीक्षकपदी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी डॉ. तावरे यांची मागील वर्षी एप्रिलमध्ये अधीक्षक पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांची या प्रकरणी विभागीय चौकशी देखील करण्यात आली होती. याचबरोबर डॉ. तावरे हे न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे एक पूर्णवेळ जबाबदारी असताना आता वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी आता देण्यात आली आहे.

आदेश निघण्याआधीच पदभार स्वीकारला?
वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ.तावरे यांची नियुक्ती करण्याचा आदेश अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी शुक्रवारी (ता.२९) काढला. मात्र, डॉ. तावरे यांनी या पदाचा कार्यभार त्याआधीच गुरुवारी (ता.२८) रात्री उशिरा स्वीकारला. विशेष म्हणजे डॉ. जाधव यांच्या अनुपस्थितीत त्यांनी हा पदभार स्वीकारला, अशी चर्चा ससूनमध्ये रंगली आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

जरांगेंचा ‘500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब’! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अडीच वर्षांनंतर हे…”

Friday, 23 October 2026, 12:41

ऑनलाइन गेमिंगमधून झटपट पैसे कमावण्याच्या आमिषाने तरुणांसह अनेक व्यावसायिक उद्ध्वस्त!; कर्जबाजारीपणातून आत्महत्यांचा धोका वाढला

Friday, 23 October 2026, 12:23

पुणेकरांची प्रतीक्षा पुन्हा वाढली! ‘पुणेरी मेट्रो’च्या उद्घाटनाला ब्रेक; हिंजवडी मेट्रो सुरू होण्याची तारीख पुन्हा लांबणीवर

Friday, 23 October 2026, 12:06

वाघोली पोलिसांकडून 51 गहाळ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत; 12.75 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Friday, 23 October 2026, 11:56

मुंबईच्या CSMT स्थानकात अचानक छताचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी

Friday, 23 October 2026, 11:50

भिगवण-राशीन रस्त्यावर कारला कट मारल्याच्या वादातून सात जणांच्या टोळक्याकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

Friday, 23 October 2026, 11:46
Next Post

देशातील रेशन दुकानदार १ जानेवारी पासून संपावर; महाबळेश्वर तालुक्याचाही सहभाग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp