बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एक धक्कादायक घडताना समोर आली आहे. आष्टी तालुक्यात दरोडा टाकण्यात आला असून हा दरोडा एवढा भयंकर होता की या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. आष्टीतील केरूळ गावातील भागवत वस्तीवर हा दरोडा टाकण्यात आला आहे. या सशस्त्र दरोड्यात महिलांना जबर मारहाण करण्यात आली असून दरोडेखोरांनी दीड वर्षाच्या बाळालाही सोडलं नाही. महिलांच्या अंगावरील सर्व दागिने लंपास करत निर्दयी दरोडेखोरांनी आणखी चार जणांना बेदम मारलं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे.
दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा..
बीडच्या आष्टी तालुक्यातील केरूळ येथील भागवत वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. या घटनेमध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरोड्यात दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरील सर्व दागिने पळवले आहेत. तर हे निर्दयी दरोडेखोर एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी त्यातील चार जणांना बेदम मारहाण केली. यात त्यांनी एका दीड महिन्याच्या बाळालाही सोडलं नाही.
महिलांना बेदम मारहाण..
दरोडेखोरांनी घरात घुसत एका हातात दीड वर्षाच्या बाळाला धरत दुसऱ्या हाताने महिलेचा गळा घोटल्याचे महिलेने सांगितले. यावेळी त्यांनी गळ्यातले सगळे दागिने खेचत बाळासह महिलेलाही जबर मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आजूबाजूला बसलेल्या महिलांच्या गळ्यात कोणताही दागिना नव्हता. दरोड्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.