GST Scam :छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय जीएसटी पथकाने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली. कारवाईत 200 कंत्राटदारांनी कोट्यावधींचा कर चुकवल्याची माहिती समोर आहे. जवळपास 40 ते 50 कोटींचा कर 200 कंत्राटदारांनी चुकवला आहे. बोगस कंपन्यांच्या बिलांद्वारे हा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी एकाला जीएसटी पथकाकडून अटक करण्यात आली आहे.
जाफर कादर या व्यक्तीच्या नावाने एक बोगस कंपनी आहे. जिचा वापर कर चुकवण्यासाठी करण्यात आला होता. जीएसटी पथकाला 200 ते 250 कोटी रुपयांची बोगस बिले त्यांच्याकडून मिळाली. बिले घेणाऱ्या कंत्राटदारांचा शोध सुरू आहे.या घोटाळ्यात काही सीए यांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
6 जिल्ह्यातील 200 फर्जी कंत्राटदार
या घोटाळ्यात मराठवाड्यातील लातूर, धाराशीव वगळता 6 जिल्ह्यातील 200 कंत्राटदारांचा या घोटाळ्यात समावेश आहे. जाफर कादर ही व्यक्ती त्याच्या नावे 8-9 कंपन्या असून त्यातील एकही कंपनी अस्तित्वात नाही. बिले घेणाऱ्या कंत्राटदारांकडे रस्ते बांधकाम, पाणी पुरवाठ्याशी संबंधित बांधकाम आदी प्रकारच्या कामांची कंत्राटे होती.