तुळजापूर : विधानपरिषदेचे माजी सदस्य ज्येष्ठ नेते नरेंद्र बोरगांवकर यांचे आज सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले आहे. तुळजापूर रोडवरील मोतीझरा स्मशानभूमीत दुपारी साडेचार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
धाराशिव आणि लातूर जिल्हा एकत्र असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर ते कार्यरत होते. तसेच ते तुळजाभवानी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तसेच बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्गचे संस्थापक सचिव पदावर काम केले आहे. ज्येष्ठ नेते नरेंद्र बोरगावंकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत.