Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिलेचं सीझर करतांना हातमोजे चक्क पोटातच विसरले डॉक्टर! कागदही पोटात विसरला अन् घरी आल्यावर पोटात झाल्या असह्य वेदना; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 August 2026, 21:14

पुणे: बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १९ वर्षीय संध्या सूरज गायकवाड या महिलेवर १ ऑगस्ट रोजी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद राहिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकारानंतर संध्या यांची प्रकृती गंभीर झाली असून, त्यांच्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संध्या यांना सिझेरियननंतर चार दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. घरी गेल्यानंतर त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे सोनोग्राफीसह काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांच्या पोटात अनोळखी वस्तू असल्याचे समोर आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

त्यानंतर संध्या यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या पोटातून सर्जिकल हातमोजे आणि कागद बाहेर काढण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

संध्या यांचे पती सूरज गायकवाड यांनी संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पत्नीची प्रकृती बिघडल्याचा आरोप केला आहे. नवजात बाळाला जन्म दिल्यानंतरही संध्या त्याला जवळ घेण्याच्या स्थितीत नसल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढावले आहे.

 

दरम्यान, या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संबंधित महिला डॉक्टर आणि शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती दिली आहे. प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, तपासात दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00
Next Post

पुण्याच्या वाहतुकीसाठी ५० वर्षांचा मास्टरप्लॅन; मेट्रो, बस, रिंग रोडसह सर्व प्रकल्पांचा एकत्रित विचार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp