Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 11 September 2026, 15:05

पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सहा सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ग्रामपंचायत कराची थकबाकी विहित मुदतीत न भरल्याच्या प्रकरणात अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. या निर्णयामुळे भाजे ग्रामपंचायतीतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे.

भाजे ग्रामपंचायतीत सरपंचासह एकूण दहा सदस्य आहेत. यापैकी सरपंचासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, तर भाजपचे तीन सदस्य होते. मात्र, अपात्रतेच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सरपंच आणि पाच सदस्य पदावरून अपात्र झाले आहेत. त्यामुळे आता भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य असे संख्याबळ उरले आहे. ग्रामसेवकांनी अपात्रतेचा आदेश प्राप्त झाल्याची अधिकृत पुष्टी केली आहे.

सरपंच प्रिया अमित ओव्हाळ, उपसरपंच कोमल किरण केदारी, विकास बबन वाल्हेकर, प्रमोद विजय डगळे, सारिका विश्वनाथ पदमुळे आणि कविता अशोक चौरे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कराची थकबाकी वेळेत न भरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी प्रताप कैलास गरवड आणि शेखर चंद्रकांत दळवी यांनी विवाद अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी अपात्रतेचा निर्णय दिला.

दरम्यान, अपात्र सदस्यांकडून या कारवाईमागे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांवर भाजपची भूमिका स्पष्ट झालेली नाही. अपात्र सदस्यांना या आदेशाविरोधात अपील करण्याची संधी आहे. अपील केल्यानंतर स्थगिती मिळाल्यास सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावर राहता येऊ शकते.

स्थगिती न मिळाल्यास किंवा अपील न केल्यास भाजे ग्रामपंचायतीत सत्तेचे समीकरण काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या परिस्थितीत बहुमताचे समीकरण बदलल्याने पुढील प्रशासकीय आणि राजकीय निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. आवश्यक असल्यास प्रशासकाची नियुक्ती होऊन त्यानंतर रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होऊ शकते. पोटनिवडणुकीत मतदारांचा कौल कोणाला मिळतो, त्यावर भाजे ग्रामपंचायतीची पुढील सत्ता ठरण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश! मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे ACBच्या जाळ्यात; टेंडरसाठी मागितली १९ हजारांची लाच

Thursday, 29 October 2026, 18:57

पुण्यात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू! इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यासोबत नेमकं काय घडलं?

Thursday, 29 October 2026, 18:25

“धंगेकरांना पुण्यात कोण विचारतं?” भाजपच्या टोमण्याने नवा राजकीय संघर्ष पेटला,पराभवानंतरही संघर्ष सुरूच..

Thursday, 29 October 2026, 17:34

पुण्यात महिला पोलिसाचा प्रताप! खाकी परिधान करून दारूच्या नशेत धिंगाणा, जाब विचारताच शिवीगाळ; पाहा व्हायरल Video

Thursday, 29 October 2026, 16:50

५ अधिकारी अन् २० अंमलदार! दिवा-मुंब्रा परिसरात छाप्याची मोठी कारवाई; तब्बल २.२० कोटींचा मुद्देमाल जप्त

Thursday, 29 October 2026, 16:47

“केसाने गळा कापला म्हणताच शिंदेंचा ‘भाई स्टाईल’ पलटवार! भाजपच्या आरोपांना थेट उत्तर; राजकारणात नवा ट्विस्ट

Thursday, 29 October 2026, 16:45
Next Post

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp