Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 February 2026, 12:23
Pimpri Murder: Enmity through love! Woman murders boyfriend, court sentences her to life imprisonment

photo - social media

Crime News: छत्रपती संभाजीनगर:  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिची हत्या केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे महिलांवरील अत्याचाराविरोधात कठोर संदेश गेला आहे. आरोपी पती लईक जावेद अन्सारी (वय 36, रा. कुंजखेडा, ता. कन्नड) याला जन्मठेपेसह 50000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मृत रेशमा (वय 23) हिचे आरोपीसोबत सुमारे सहा महिन्यांपूर्वी दुसरे लग्न झाले होते. पहिल्या लग्नातून तिला पाच वर्षांची मुलगी असून कौटुंबिक कारणांमुळे ती पहिल्या पतीपासून वेगळी झाली होती. दुसऱ्या विवाहानंतर सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही काळानंतर पतीकडून शारीरिक संबंधांच्या कारणावरून शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ सुरू झाल्याचे रेशमाने आपल्या माहेरच्या लोकांना सांगितले होते.

 

मुलीच्या तक्रारीनंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये बैठक घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही छळ थांबला नाही, असे रेशमाने पुन्हा सांगितले होते. 24 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री रेशमा माहेरी आली होती आणि त्रास सुरू असल्याची माहिती दिली होती. रात्री उशीर झाल्याने सकाळी चर्चा करू, असे सांगून तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आले.

25 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे सुमारे 3.30 वाजता आरोपीने आपल्या मित्राला फोन करून पत्नीला मारल्याची माहिती दिली. त्यानंतर ही बाब रेशमाच्या वडिलांना कळवण्यात आली. माहिती मिळताच माहेरचे लोक तातडीने तिच्या घरी पोहोचले. घराला बाहेरून कुलूप असल्याने ते तोडून आत प्रवेश केला असता रेशमा जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीनंतर साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

Friday, 8 May 2026, 17:00
Next Post

गुलाबपुष्पांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत; लोणी काळभोरमध्ये उत्साहात परीक्षा सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.