Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुलाबपुष्पांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत; लोणी काळभोरमध्ये उत्साहात परीक्षा सुरुवात

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 10 February 2026, 12:52

Loni Kalbhor News : लोणी काळभोर, ता. 10 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारी (ता. 10) सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यामुळे परीक्षा केंद्र परिसरात सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

लोणी काळभोर येथील केंद्रावर प्राचार्य सीताराम गवळी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. “बारावी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. आत्मविश्वास, शांत मनःस्थिती आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थ्याने यश मिळवावे,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी परीक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

 

याप्रसंगी केंद्र संचालक प्रा. सदानंद साळुंके, सहाय्यक केंद्र संचालक प्रा. अर्जुन कचरे, प्रा. संतोष वडर, शशिकांत शेंडगे, प्रा. जगदीप तिकोणे, प्रा. जितेंद्र साळुंखे, हवेली तालुका माध्यमिक शिक्षण संघटनेचे सचिव भाऊसाहेब महाडिक यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून येत होता. या परीक्षा केंद्रात पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलचे 491, चिंतामणी विद्यालय थेऊरचे 44, एमआयटीचे 270, एंजेल हायस्कूलचे 110, फुरसुंगी येथील लिटल फ्लॉवर ज्युनिअर कॉलेजचे 56 तसेच वडकी येथील मोडक इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजचे 15 असे एकूण 986 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. मात्र 8 विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती सहाय्यक केंद्र संचालक अर्जुन कचरे यांनी दिली.

दरम्यान, परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत करण्यात आली असून भरारी पथके, मंडळ सदस्य व शासकीय अधिकाऱ्यांच्या आकस्मिक भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32
Next Post
Ahilyanagar news

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! विहिरींच्या दुरुस्तीसाठी 'या' जिल्ह्याला 63 लाखांचा निधी  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.