छत्रपती संभाजीनगर : आज सकाळी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी एक धाडसी कारवाई केली आहे. फीरोजपूर, पंजाब येथील तिहेरी हत्याकांडात सामील असलेल्या सात अत्यंत धोकादायक आरोपींना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेत एका तरुण महिलेची, जिचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते. तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
शस्त्रांनी सुसज्ज असलेले हे आरोपी वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्राभर पळत होते. परंतु या आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस दलाने मोठ्या शिताफीने पकडले आहे. ही कारवाई म्हणजे एखाद्या चित्रपटातली थरारक घटना वाटावी अशी होती.
आम्हाला मिळालेल्या माहितीने ही लढाई जिंकली, आणि आमच्या शूर पोलिसांनी सातही आरोपींना पळ काढण्याआधीच ताब्यात घेतलं. आता पंजाब पोलिस आमच्याशी सातत्याने संपर्कात असून या आरोपींना आज संध्याकाळी त्यांच्या ताब्यात दिले जाईल.
प्रवीण पवार,पोलीस आयुक्त