chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेमविवाहावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचे पगायला मिळाले. यात लाठ्याकाठ्यांनी तसेच चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी आरोपी संतोष बरथुने, रतन, नरेंद्र, प्रकाश बरथुने यांच्यासह तीन महीलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुण तरुणीच्या प्रेमविवाहातून झालेल्या वादात दोन गटात, चाकू तसेच लाठ्याकाठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली. 27 डिसेंबरला रात्री दहा वाजता मोची मोहल्ला, पदमपुरा भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरुन वेदांतनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहील्या गटाच्यावतीने गुलाब गंगाराम बरथुने वय 75 रा. मोची मोहल्ला यांनी तक्रार दाखल केली. बरथुने यांच्या नातीने त्याच परिसरातील जयेश मेहरा याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. यामुळे संतापलेल्या आरोपी भारत मेहरा, तुषार, जयेश, सुंदर, राजेश आणि गणेश मेहरा 27 डिसेंबरला रात्री बरथुने यांच्या घरासमोर आले. तुमची मुलगी लग्नासाठी आमच्या घरात द्यायला नकार का दिला या कारणावरुन त्यांनी वाद घालत बरथुने कुटूंबावर चाकूने हल्ला केला. याच प्रकरणात दुसर्या गटाच्यावतीने शारदा मेहरा यांनी तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांच्या दिराच्या मुलाने बरथुने यांच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला आहे.