Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या दिवसांतच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आणि परवानगी न घेताच गैरहजर राहून काम बंद आंदोलन केल्याने मनपाच्या अत्यावश्यक सेवेवर परिणाम झाला. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले. महापालिकेच्या पाणीपुरवठा, अग्निशमन या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या विभागासह यांत्रिकी, पशुसंवर्धन विभागातील एकूण 90 कंत्राटी कर्मचाऱ्यांना थेट कामावरून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘एस्मा’ही लावणार
महापालिकेतील कायमस्वरूपी किवा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून शहरातील जनतेला वेठीस धरले जात असेल तर, त्यांना कामावरून काढून टाकणारच, शिवाय त्यांना एस्मा कायदा लावणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकूण 4 हजार पेक्षा अधिक कर्मचारी असून, यातील 2500 कंत्राटी कर्मचारी आहे. दरम्यान, अशात 123 कायमस्वरूपी कर्मचारी पहिल्या आणि 285 कर्मचारी दुसऱ्या टप्प्यात भरले जाणार आहे. त्यामुळे 500 कर्मचारी कमी करण्याचा निर्णय मनपा घेणार होते. असे असतानाच कंत्राटी कर्मचारी यांच्याकडून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.
का कारवाई केली?
प्रत्येक महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या मनपाच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्याची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे मनपाच्या सर्वच विभागात कर्मचाऱ्यांची कमी भासत आहे. मनपाच्या वेगवेगळ्या विभागात हे कंत्राटी कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. असे असून सुद्धा नागरिकांना मुलभूत व अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविण्याच्या कामात हे कर्मचारी निष्काळजीपणा करीत असल्याचे आढळून आले.