Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काय रे, तुला मराठी वाचता येत नाही? 11 वर्षीय मुलाला गजाला बांधून बेदम मारहाण, सावत्र आईसह तिघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 June 2026, 15:48

दौंड, ता. २७ : धाराशिव जिल्ह्यातील राघुचीवाडी येथे ११ वर्षीय मुलाला घराच्या टेरेसवर नेऊन लोखंडी गजाला बांधून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठी वाचता येत नसल्याच्या कारणावरून सावत्र आई, आजी आणि एका नातेवाईकाने बालकाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोरवडी (ता. दौंड) येथील शेतकरी संजय साहेबराव गुन्नर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलगी राणी हिचा मृत्यू २०१४ मध्ये झाल्यानंतर तिचा मुलगा यशराज महादेव कर्वेल (वय ११) हा आजोबा-आजींकडे खोरवडी येथे राहत होता. काही वर्षांपूर्वी यशराजचे वडील महादेव कर्वेल यांनी दुसरे लग्न केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी यशराजला शिक्षणाच्या कारणास्तव धाराशिव जिल्ह्यातील राघुचीवाडी येथे नेण्यात आले होते.

२३ जून रोजी सकाळी फिर्यादी संजय गुन्नर यांना एका नातेवाईक महिलेचा फोन आला. यशराजला सावत्र आई पूजा महादेव कर्वेल, दादा संजय भुजनर आणि आजी शकुंतला नरसु कर्वेल मारहाण करत असल्याची माहिती तिने दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी संबंधितांना फोन करून मुलाला मारहाण करू नका, अन्यथा पोलिसांत तक्रार करीन, असा इशारा दिला.

 

रात्री यशराजला दौंड येथील गोकुळ हॉटेलजवळ आणून सोडण्यात आले. घरी आल्यानंतर यशराजने आजोबांना आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. मराठी वाचता येत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याला घराच्या टेरेसवर नेले. तेथे पोटाला लोखंडी गजाला बांधून दोन्ही पाय बांधले. त्यानंतर सावत्र आई पूजा कर्वेल आणि दादा भुजनर यांनी हाताने मारहाण केली, तर आजी शकुंतला कर्वेल यांनी प्लास्टिकच्या पाईपने हातावर मारहाण करून “जिवे मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचे यशराजने सांगितले.

या घटनेनंतर यशराज प्रचंड घाबरला असून त्याला तापही आला होता. प्रकृती सुधारल्यानंतर फिर्यादी यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पूजा महादेव कर्वेल, दादा संजय भुजनर आणि शकुंतला नरसु कर्वेल (सर्व रा. राघुचीवाडी, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 351(2), 3(5) तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 च्या कलम 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

'आई गं माझं पोट दुखतंय" म्हणून दवाखान्यात नेलं अन् बाळ घेऊनंच घरी आले; १५ वर्षीय शाळकरी मुलीसोबत घडलं भयंकर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.