Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 24 July 2026, 15:41

यवत, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल न्यू दिल्ली दरबार येथे जेवणासाठी थांबलेल्या बसमध्ये प्रवाशाच्या बॅगेतील 7 लाख 12 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली.

पनवेल येथून कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या ऑरेंज ट्रॅव्हल्सच्या बसमधून जावजीबुवाचीवाडी (ता. दौंड) येथे सोमवारी (ता. 20) रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाशकुमार हिंदुराम सावलेसा (वय 44, रा. पनवेल, जि. रायगड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाशकुमार सावलेसा हे खाजगी नोकरीनिमित्त तसेच मित्राला भेटण्यासाठी सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पनवेल येथून ‘ऑरेंज ट्रॅव्हल्स’च्या बसने बसवकल्याण (जि. बिदर, कर्नाटक) येथे जाण्यासाठी निघाले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी, ब्रासलेट आणि दोन अंगठ्या पाठीवर असलेल्या बॅगमध्ये एका कापडी पिशवीत सुरक्षित ठेवल्या होत्या.

रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बस पुणे-सोलापूर हायवेवरील ‘हॉटेल न्यू दिल्ली दरबार’ जावजीबुवाचीवाडी येथे जेवणासाठी थांबली होती. फिर्यादी प्रकाशकुमार हे लघुशंकेसाठी खाली उतरले आणि अवघ्या 5 मिनिटांत पुन्हा बसमधील आपल्या सीटवर गेले. त्यावेळी त्यांची बॅग जशीच्या तशी होती. त्यानंतर ते पुन्हा थोडा वेळ पाय मोकळे करण्यासाठी बसखाली आले.

 

अवघ्या 15 मिनिटांनंतर ते पुन्हा सीटवर गेले असता, त्यांना पाठीवरील बॅगमधील सर्व कपडे आणि साहित्य सीटवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले. संशय आल्याने त्यांनी बॅग तपासून पाहिली असता, बॅगेतील कापडी पिशवीसह सोन्याचे सर्व दागिने गायब झाले होते. यामध्ये गळ्यातील साडेचार तोळ्यांची सोन्याची चैन, तीन तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट, प्रत्येकी एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा बॅगेतील 7 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल दिसून आला नाही.

दरम्यान, दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच सावलेसा यांनी बस चालक आणि क्लिनर यांना माहिती दिली. चालकाच्या मदतीने संपूर्ण बसची तपासणी करण्यात आली; मात्र सोन्याचे दागिने हाती लागले नाहीत. हॉटेलवर गाडी थांबलेली असतानाच कुणीतरी अज्ञात भामट्याने संधी साधून बॅगमधून दागिने लंपास केल्याची खात्री पटल्यानंतर सावलेसा यांनी यवत पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक मेललवाड करीत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp