Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आई गं माझं पोट दुखतंय” म्हणून दवाखान्यात नेलं अन् बाळ घेऊनंच घरी आले; १५ वर्षीय शाळकरी मुलीसोबत घडलं भयंकर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 June 2026, 15:52

बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. १५ वर्षांच्या शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचारातून तिने एका बाळाला जन्म दिल्याची ही घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी बीड-अहिल्यानगर महामार्गालगतच्या शाळेत शिकत आहे. साधारण वर्षभरापूर्वी, शाळा सुटल्यावर घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिला ‘गावात सोडतो’ असे आमिष दाखवून वाहनात बसवले. त्यानंतर तिला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. नराधमाने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही आणि वर्षभर ती हा मानसिक व शारीरिक त्रास सहन करत राहिली.

दोन दिवसांपूर्वी मुलीला पोटात तीव्र कळा येऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारांसाठी नेले. तिथे वैद्यकीय तपासणीदरम्यान ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले आणि काही वेळातच तिने एका बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी तत्काळ अंभोरा पोलिसांना या गंभीर प्रकाराची माहिती दिली.

 

अंभोरा पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला असून अज्ञात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहितेचे कलम ६५ (१) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) च्या कलम ४ व ८ अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अंभोरा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत आणि मुख्य आरोपीचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील. ही घटना समाजासाठी अत्यंत लाजीरवाणी असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post
ai image

पुन्हा सिया गोयल पॅटर्न! प्रियकरासाठी केली पतीची हत्या; पतीचे पाय बांधले, छातीवर बसली अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.