Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुन्हा सिया गोयल पॅटर्न! प्रियकरासाठी केली पतीची हत्या; पतीचे पाय बांधले, छातीवर बसली अन्…

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 27 June 2026, 16:03
ai image

सांगली: सांगलीतील पोळ मळा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक खुनाच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पतीच्या सततच्या त्रासाला आणि मारहाणीला कंटाळून एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला कायमचे संपवल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. आनंद हणमंत सर्जे (वय 28) असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्नी आणि तिच्या २३ वर्षीय प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आनंद हा शहरात सेल्समन म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि २ लहान मुले (४ वर्षे आणि ६ महिने) असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून पत्नीने तातडीने आपल्या प्रियकराला घरी बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनी मिळून आनंदचे पाय ओढणीने बांधले आणि छातीवर बसून त्याचा गळा आवळून क्रूरपणे खून केला.

हा खुनाचा प्रकार लपवण्यासाठी पत्नीने आणि तिच्या भावाने पहाटेच्या सुमारास आनंदला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या गळ्यावर काही संशयास्पद खुणा दिसून आल्याने पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील रुग्णालयात हलवला. वैद्यकीय अहवालात गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केली. सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीने अखेर आपला गुन्हा मान्य केला.

 

आनंद आणि त्याची पत्नी यांचा प्रेमविवाह झाला होता, परंतु लग्नानंतर काही काळाने त्यांच्यात मतभेद सुरू झाले होते. पतीच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने प्रियकराच्या साथीने हा कट रचला. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

तेलकट जास्त खाताय? एका व्यक्तीसाठी महिन्याला किती प्रमाणात तेल योग्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.