Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

40 हजार घेताच BMC अधिकाऱ्याचा खेळ संपला! ACBच्या सापळ्यात अडकला लाचखोर अधिकारी

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 30 July 2026, 9:24

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) जलविभागातील एका अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. अंधेरी पश्चिम येथील ‘के/पश्चिम’ विभागातील जलमापक पर्यवेक्षकाला 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महापालिकेच्या विभागांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणात विनोद भगवान राठोड यांना अटक करण्यात आली आहे. तर नंदन बाळकृष्ण मोरे फरार असून, दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या दुकानासाठी पाणी मीटर बसवणे आणि पुनर्नळ जोडणी मिळवण्यासाठी 20 जुलै 2026 रोजी महापालिकेकडे अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी जलमापक पर्यवेक्षक विनोद भगवान राठोड आणि जलमापक निरीक्षक नंदन बाळकृष्ण मोरे यांनी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सुरुवातीला या कामासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, चर्चेनंतर 80 हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. यातील पहिला हप्ता म्हणून 40 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.

तक्रार मिळाल्यानंतर एसीबीने 29 जुलै रोजी या प्रकरणाची पडताळणी केली. त्यावेळी जलमापक निरीक्षक नंदन मोरे यांनी तक्रारदाराला 40 हजार रुपये जलमापक पर्यवेक्षक विनोद राठोड यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले.

 

त्यानंतर एसीबीच्या पथकाने एस. व्ही. रोडवरील ‘टॉप-10 मोबाईल शॉप’समोरील फुटपाथवर सापळा रचला. पंचांच्या उपस्थितीत विनोद राठोड यांनी 40 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली.

दरम्यान, एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही सरकारी कामासाठी लाच मागितल्यास तातडीने विभागाशी संपर्क साधावा आणि भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करावी.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

31 डिसेंबरनंतर नंबर प्लेट नसली तर कारवाई; HSRP बाबत परिवहन मंत्र्यांचा मोठा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp