Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 31 August 2026, 23:24

पुणे: नांदेडच्या किनवट तालुक्यातील तोटंबा घाटात भाविकांच्या कमांडर जीपला भीषण अपघात झाला. सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या प्रवाशांच्या जीपचा हा अपघात झाला असून, या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील कुबीर मंडळातील पारडी येथील काही नागरिक सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते कमांडर जीपने तेलंगणाकडे परतत होते. याचदरम्यान तोटंबा घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

धडक इतकी भीषण होती की, जीपमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जीपमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तेलंगणातील कुबीर येथे हलवण्यात आले आहे.

अपघातग्रस्त कमांडर जीप सहस्रकुंड ते तेलंगणा या मार्गावर नियमित प्रवासी वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील माहिती घेतली जात आहे. या दुर्घटनेमुळे सहस्रकुंड परिसरासह तेलंगणातील पारडी आणि कुबीर परिसरातही शोककळा पसरली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या लॉटरीसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी संधी

Wednesday, 14 October 2026, 23:00

वरकुटे बुद्रुकमध्ये चोरट्यांचा डल्ला! घरातून १.३० लाखांची रोकड अन् सोन्या-चांदीचे दागिने लंपास; चोरट्याविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 14 October 2026, 22:21

अन् मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या नगरसेवकांना झाप-झाप झापलं! देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर; म्हणाले “मी सगळ्यांचं रिपोर्टकार्ड…

Wednesday, 14 October 2026, 19:53

जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच दिला धोका! पुण्यात घरकाम करण्याऱ्या महिलेचा कारनामा; संधी साधत कपाटातून..

Wednesday, 14 October 2026, 19:39

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर! पदोन्नती प्रक्रियेतला अडथळा झाला दूर; ‘ती’ अट झाली रद्द

Wednesday, 14 October 2026, 19:35

पुणे जिल्ह्यातून बाहेर चारा नेण्यास सक्त मनाई! दुष्काळामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा आणि कडक निर्णय

Wednesday, 14 October 2026, 19:27
Next Post

Daily Horoscope: 1 सप्टेंबरचा मंगळवार ठरणार लकी! या राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रगतीची मोठी संधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp