Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांची तक्रार; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 30 July 2026, 8:26

पुणे: अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर आता विभागातीलच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. ही लेखी तक्रार अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे देण्यात आली आहे.

15 जुलै रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात प्रयोगशाळेतील कामाचा वाढलेला ताण, अपुरे मनुष्यबळ आणि नवीन कामकाज पद्धतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासाठी आवश्यक कर्मचारी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.

कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे की, रिक्त पदांमुळे आधीच कामाचा भार वाढला आहे. त्यातच सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करावे लागत आहे. तसेच शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

अन्न, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या नमुन्यांची तपासणी करताना पुरेसा वेळ आवश्यक असतो. भारतीय औषध संहिता (IP), ब्रिटिश फार्माकोपिया (BP) आणि USP यांसारख्या मानकांनुसार तपासणी करावी लागते. मात्र, वाढलेल्या नमुन्यांच्या दबावामुळे तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

प्रयोगशाळेची क्षमता, उपकरणे आणि कर्मचारी संख्या वाढविल्यानंतरच दोन शिफ्ट सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पूर्वीची कार्यालयीन वेळ लागू करावी आणि अतिरिक्त कामासाठी योग्य सुविधा व भत्ते द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही FDA च्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ खासगी आस्थापनांवर कारवाई न करता सरकारी आणि निमसरकारी ठिकाणच्या कँटिनचीही तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने किरकोळ कारणांवरून थेट परवाना रद्द करण्याच्या निर्णयावरही निरीक्षण नोंदवले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

40 हजार घेताच BMC अधिकाऱ्याचा खेळ संपला! ACBच्या सापळ्यात अडकला लाचखोर अधिकारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp