परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डिमांड आणि पिक कर्ज वेळत न दिल्याच्या रागातून भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्याच्या थेट कानशिलातच लगावल्याची घटना घडली आहे. हे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. भाजपचे परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांनी बँकेच्या एमडी समोरच कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली. जिल्हा बँकेला 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत होती. या सर्व कर्मचाऱ्यांना सतत सांगण्यात देखील येत होते. पण त्यांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक कर्जाची रक्कम जमा झाली नसल्याने आपण हे कृत्य केल्याचं स्पष्टीकरण आनंद भरोसे यांनी दिलं आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परभणी शाखेमध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांचे डिमांड आणि पीक कर्ज मंजूर झालेली आहेत. परंतु, बँकेतील तीन कर्मचाऱ्यांमुळे या कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही. याबाबत बँकेचे संचालक आनंद भरोसे यांनी बँकेत जाऊन जाब विचारला. यावेळी बँकेचे एमडी कुरुंदकर देखील उपस्थित होते.
हेही वाचा:
अखेर इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाशी झाला संपर्क, अडचणीनंतर अभिनेत्री सुरक्षितपणे परतणार भारतात