बीड: उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी बीड येथील जाहीर सभेत भाजपत गेलेले योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) यांच्यावर केलेल्या टीकेला योगेश क्षीरसागर यांनी तेवढ्याच कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “पक्ष काय तुझ्या काकाचा झालाय काय?” या अजित पवारांच्या खोचक प्रश्नाला उत्तर देताना क्षीरसागर म्हणाले, “पक्ष माझ्या काकाचा नाही, तो त्यांच्याच काकाचा आहे. फक्त तो व्यवस्थित चालवा”. असं योगेश क्षीरसागर म्हणले. (Yogesh Kshirsagar on Ajit Pawar)

Ajit Pawar यांची टीका
बीडमध्ये प्रचारसभा घेत असताना अजित पवारांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले निवडणुकीपूर्वी योगेश क्षीरसागर यांनी फोन करून 53 एबी फॉर्म मागितले होते. या मागणीवरून अजित पवारांनी त्यांना “तुझ्या काकाचा पक्ष झालाय काय?” असे विचारले होते, अशी आठवण त्यांनी सभेत करून दिली. मागील 30-35 वर्षांत बीडचे वाटोळे झाल्याचे वक्तव्यही अजित पवारांनी केले होते. “काहीजण म्हणतात आम्हीच कामं मंजूर केली. अरे तुझ्या हातात काय होतं? मी पालकमंत्री आहे,” असे म्हणत त्यांनी क्षीरसागरांना खडसावलं.
हेही वाचा: पुणे जमीन व्यवहारात पार्थ पवार यांच्या स्टॅम्प ड्युटी नोटीसवर 15 दिवसांची मुदतवाढ
Yogesh Kshirsagar यांचा उपरोधिक पलटवार
अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना योगेश क्षीरसागर यांनी उपरोधिक टोलेबाजी केली. म्हणाले “दादा म्हणतात पक्ष काय तुमच्या काकाचा नाही… तो त्यांच्याच काकाचा पक्ष आहे. त्यांनी तो पक्ष नीट हँडल करावा, एवढ्याच त्यांना शुभेच्छा आहेत,” असे म्हणत क्षीरसागर यांनी अजित पवारांना लक्ष्य केले.
“मागील 35 वर्षांमध्ये पाच-सात निवडणुका झाल्या. निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला स्वीकारले आहे. या 35 वर्षांमध्ये त्यांच्याकडे जे उमेदवार आहेत, तेही आमच्याकडेच होते, मग त्यांनी त्यावेळेस विरोध का केला नाही?” असा सवाल योगेश क्षीरसागरांनी उपस्थित केला.
भाजपची ताकद वाढली
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला असून त्यांची सभाही चांगली झाल्याचे योगेश क्षीरसागर यांनी सांगितले. यामुळे भाजपची ताकद वाढल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीड नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: चारित्र्यावर संशय, भररस्त्यात पत्नीवर वार; पुण्यातील औंढ येथील खळबळजनक घटना







