Pune Crime: औंढ ता. 25: पुण्यात दिवसेंदिवस वाढत चालेल्या गुन्हेगारी आता थांबायचं नाव घेत नाही. अशातच एका पतीने आपल्या पत्नीवर धारधार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुण्यातील औंढ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. (Latest Pune Crime)

हेही वाचा- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आज फैसला; न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपी पतीने तीच्यावर चाकूने सपासप वार केले. केतन वसंत जगताप असं आरोपीचे नाव आहे. पीडित महिला आपल्या पती सोबत गोऱ्हे बुद्रुक जगताप आळी खडकवासला येथे स्थाईक आहेत. रितीका केतन जगताप असं पीडित महिलेचे नाव आहे. रितीकाने खडकवासला पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरोधात फिर्याद दिली. आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
रितीका आणि केतन यांच्यामध्ये नेहमी भांडण होत असे. तो तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. यामुळे वैतागून रिताका आपल्या माहेरी निघून गेली. दरम्यान त्यांने 22 नोव्हेंबर रोजी रितीकाला भेटण्यासाठी बोलवले. औंढ येथील एका टपाल पेटीजवळ तीचा भेटण्यासाठी बोलवलं. तेथे केतनने आपल्या पत्नीवर कोयत्नाने सपासप वार केला. या घटनेत रितीका जखमी झाली आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा- Pune News: गृहिणींचे बजेट बिघडले! भाज्याचे दर गगनाला भिडले; तपासा काय महागले







