छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड तालुक्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिट्टीत सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत. सरकारकडून सतत मराठा समाजाची फसवणूक होत आहे. असे नमूद करत शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
अधिक माहिती अशी की, राज्यात महायुती सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केलं. मात्र त्या उपोषणाला सरकारकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं आहे. आता एकीकडे जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत असतानाच दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड तालुक्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिट्टीत सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत. सरकारकडून सतत मराठा समाजाची फसवणूक होत आहे. असे नमूद करत शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. समाधान रायभान काळे असं आत्महत्या करणाऱ्या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील रहिवासी आहेत. आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी शनिवारी गावाजवळील शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
यासंबंधीत पोलिसांना चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत समाधान यांनी आत्महत्येचं कारणही नमूद केलं आहे. त्यांनी सरकारकडून फसवणूक होत असल्याचं नमूद करून आपला शेवट केला आहे. या आत्महत्येनं तरी सरकारचे डोळे उघडतील, असं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिल्लोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.