छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंगच्या घटनेनं राज्य हादरलं आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या वडिलांनी आणि भावानेच तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासोबतच लग्न झालं म्हणून ते दोघे तरुण-तरुणी आनंदात होते. मात्र त्यांचा हा आनंद एक महिनाही टिकला नाही. तरुणीच्या भावानं आणि वडिलांनी तरुणाची हत्या केली. अमित साळुंखे असं हत्या झालेल्या 22 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर हादरलं!!
आंतरजातीय विवाह केला म्हणून तरुणाची हत्या करण्यात आली, हल्ल्यापूर्वी हा तरुण ‘पब्जी’ खेळत होता, त्या व्हिडीओमध्ये त्याचा आवाज रेकॉर्ड झाला आहे.#pubg pic.twitter.com/sMjWBnzp5D— Pune Prime News (@puneprime_news) July 27, 2024
दरम्यान, अमितने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. मात्र मुलीच्या वडिलांनी आणि भावाने अमित वर 14 जुलै रोजी चाकू आणि तलवारीने हल्ला केला. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. अमित साळुंखे नावाच्या 22 वर्षांच्या गोंधळी समाजाच्या मुलाशी विद्या किर्तीशाही हीने पुण्याला पळून जाऊन लग्न केले होते. मुलाच्या कुटुंबाने या आंतरजातीय विवाहाचा स्वीकार केल्याने ते परत छत्रपती संभाजीनगर येथील इंदिरा नगरमध्ये राहायला होते.
मुलीच्या कुटुंबाने हे लग्न मान्य केलं नाही. त्याच रागातून अमित साळुंखेवर 14 जुलै रोजी हल्ला करण्यात आला होता. अमित पबजी खेळत असतांना मित्रांनी त्याला बाहेर बोलावले. बाहेर आल्यावर विद्याच्या चुलत भावांनी अमितवर चाकू तलवारीने हल्ला केला आणि अमितचा बळी गेला. पबजी खेळतच तो बाहेर पडला. त्याच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्याने केलेली आरडाओरड त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली आहे. अंगावर शहारे आणणारा अमितच्या आवाजाचा व्हिडीओ सद्या व्हायरल होत आहे.