छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यातील १९ नायब तहसिलदारांच्या बदल्या शासनाने मंगळवारी (दि.६) सायंकाळी केल्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार जणांचा समोवश आहे. तर उर्वरित जिल्ह्यातील १५ जणांचा समावेश आहे. राज्यातील ३५ नायब तहसिलदारांच्या बदल्या करण्यात आल्या.
तसेच ५ उपजिल्हाधिकाऱ्यांच्याही बदल्या शासनाने केल्या आहेत. जिल्ह्यातील अविनाश अंकुश, गोरख सुरे, सुनील गायकवाड यांची विभागीय आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. तर सुधाकर मोरे यांची गंगापूर तहसीलममध्ये, एल.एच. गायकवाड फुलंब्री, सचिन वाघमारे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली आहे.