konkan news रत्नागिरी: रत्नागिरीतल्या बाजारपेठेपाठोपाठ आता कोकणातील रेल्वे स्थानकांवरही कर्नाटकातून आलेल्या आंब्याची हापूस आंबा म्हणून विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Mango from Karnataka sold as alphanso Mango; Mango growers in Konkan gave warning to the vendors)
कर्नाटकचा आंबा देऊन फसवणूक
कोकण रेल्वेने प्रवास करणारे हजारो प्रवासी प्लॅटफॉर्मवर आंबा खरेदी करत असतात. (konkan news) हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा देऊन त्यांची फसवणूक होत आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी कोकणातल्या आंबा बागायतदारांनी रेल्वे स्थानकांवर गुरुवारी धडक दिली. (konkan news) त्यावेळी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर असलेल्या स्टॉलवर कर्नाटकमधून आलेल्या आंब्यांची हापूस आंबा म्हणून विक्री होत असल्याची उघडकीस आली. (konkan news) रेल्वे स्थानकावरील आंबा विक्रेत्यानेही यावेळी कर्नाटकच्या आंब्याची हापूसच्या नावानं विक्री होत असल्याची आणि भविष्यात अशा प्रकारची विक्री करणार नसल्याची कबुली दिली. यावेळी रेल्वे पोलीस दलातील अधिकारीही हजर होते. (konkan news)
आमचा विरोध हा कर्नाटक आंब्यांच्या विक्रीला नसून, हापूसच्या नावाखाली होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीला आहे.(konkan news) त्यामुळं कर्नाटक आंब्याची विक्री करताना तशी माहिती ग्राहकांना द्यावी अशी अपेक्षा बागायतदारांनी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mango : कृषि पणन मंडळाच्या निर्यात सुविधांवरुन अमेरिका व जपानला आंबा निर्यात सुरू…!
JOB : कोकण रेल्वेमध्ये अभियंता पदाच्या नोकरीची उत्तम संधी…!