Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साखर उद्योगात नवा विक्रम! महाराष्ट्रातून तब्बल 98.95 लाख टन साखरेची निर्मिती; पण विक्रमी उत्पादनानंतरही शेतकरी चिंतेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 5 April 2026, 16:28

यंदाच्या साखर हंगामात महाराष्ट्राने देशात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून उत्तर प्रदेशला मागे टाकत उत्पादनात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 31 मार्च पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्राने साखर उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने जाहीर केलेल्या अहवालानुसार यंदा देशातील एकूण साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. देशात यंदा एकूण 271.20 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण 248.65 लाख टन इतके होते. राष्ट्रीय स्तरावर उत्पादनात साधारण 23 टक्के वाढ झाली आहे.

राज्यांच्या उत्पादनाची तुलना केली असता महाराष्ट्र 98.95 लाख टनांसह अव्वल स्थानी आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र 80.10 लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर होता, तर उत्तर प्रदेश 91 लाख टनांसह पहिल्या क्रमांकावर होता. यंदा मात्र उत्तर प्रदेशचे उत्पादन घटून 87.45 लाख टनांवर आले आहे. कर्नाटक राज्याने देखील 46.27 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी यंदा आपली स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

 

यंदाच्या हंगामात देशभरातील 541 साखर कारखान्यांनी गाळप प्रक्रियेत सहभाग घेतला होता, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 210 कारखान्यांचा समावेश होता. राज्याचा गाळप हंगाम यंदा सरासरी 110 दिवस चालला, जो गेल्या वर्षी केवळ 83 दिवस होता. सध्या राज्यातील 210 पैकी 202 कारखान्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित 8 कारखाने येत्या काही दिवसात बंद होण्याची शक्यता आहे.

साखर उत्पादनाचे आकडे समाधानकारक असले तरी साखर उद्योगासमोरील आव्हाने मात्र संपलेली नाहीत. तज्ज्ञांच्या मते कोणत्याही कारखान्याचे आर्थिक गणित जुळण्यासाठी हंगाम किमान 140 ते 150 दिवस चालणे आवश्यक असते. यंदा हंगाम वाढला असला तरी तो या निकषापर्यंत पोहोचलेला नाही. तसेच हवामान खात्याने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, ज्याचा थेट परिणाम पुढील वर्षीच्या ऊस लागवडीवर होऊ शकतो. उत्पादन वाढले असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि साखरेचा हमीभाव यातील तफावत कारखानदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘बायको आणि आई मला घरात येऊ देत नाही’ त्रासाला कंटाळून त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं अन्…

Wednesday, 10 June 2026, 15:01

मेट्रो, बसने प्रवास करा अन् पगारात मिळवा वाढ; कर्मचाऱ्यांसाठी नवी योजना

Wednesday, 10 June 2026, 14:57

लंडनमधून फिरवतो पुण्याची सूत्र! ‘या’ ॲपवरून गुपचूप करायचा संपर्क; घायवळ बंधूंबद्दल धक्कादायक खुलासा

Wednesday, 10 June 2026, 14:24

जास्त प्रवाशांना बसवल्याने गोदावरीत बोट उलटली अन् 50 जण

Wednesday, 10 June 2026, 14:24

पूर्व पुण्यातील पाणीकपात रद्द; नागरिकांना दिलासा

Wednesday, 10 June 2026, 14:10

सासरच्या छळाला कंटाळून डाळिंब येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू-सासऱ्यासह 6 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 13:43
Next Post
Oh my god! A bribe of Rs 6 lakh was demanded from the cell officer to sanction the funds; The bribe-taking officer was arrested by the ACB

बाप रे! निधी मंजूर करून देण्यासाठी कक्ष अधिकाऱ्याचे मागितली चक्क 6 लाखांची लाच; लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.