पुणे : राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकण, विदर्भासह अन्य काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर गुरुवारी जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळत ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींसह पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.