Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अडविल्याप्रकरणी गुन्हे दाखल, उरुळी कांचन ग्रामस्थांचा प्रचंड संताप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 4 July 2024, 10:39
FIR registered against uruli kanchan villagers for stopping sant tukaram maharaj palakhi procession

उरुळीकांचन : जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला उरुळीकांचन (ता. हवेली) येथे अडविण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी बुधवारी तीन जुलै रोजी केला होता. त्यानंतर याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर ग्रामस्थांवर कारवाई केली असून उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथे पोहचल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी सोहळ्यातील नगारा बैलगाडा अडविण्याचा प्रयत्न केला होता. पालखी रोखल्याने सोहळ्याचे विश्वस्त आणि गावकरी यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली होती.

त्यानंतर यवत मुक्कामी ठिकाणी आरती झाल्यानंतर पालखी सोहळा विश्वस्तांनी निषेध सभा घेऊन वारकऱ्यांच्या वतीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर या पालखी सोहळ्याला अडथळा निर्माण करणाऱ्या ग्रामस्थांवर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरुळी कांचनचे सरपंच अमित कांचन, माजी सरपंच भाउसाहेब कांचन, अलंकार कांचन, संतोष उर्फ पप्पु कांचन, प्रताप कांचन, राजेंद्र कांचन यांच्यासह इतर 15 ते 20 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले आहेत. भारतीय न्याय संहिता कलम 126 (2) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर गुन्ह्यात जिल्हाधिकारी आदेशाचे भंग करणे आणि सार्वजनिक व्यवस्थेचा भंग करण्याचा कलमांचा समावेश आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी अद्यापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही.

याबाबत उरुळी कांचनचे सरपंच अमित बाबा कांचन म्हणाले की, उरुळी कांचन येथील मागील ५६ वर्षाची परंपरा लक्षात ठेऊन, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची दुपारची सेवा आमच्याकडून घडावी म्हणून आम्ही मागणी करीत होतो. मात्र, गुन्हा दाखल होणे म्हणजे हा आमच्यासह ग्रामस्थांवर अन्याय आहे. याबाबत आम्ही लवकरच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागणार आहोत. यामध्ये पालखी सोहळा प्रमुख असलेल्या मोरे घराण्यांच्या चुका आहेत. यापुढील काळात पालखी सोहळ्याचे सर्व नियोजन प्रशासनाकडे द्यावे, अशी मागणी करणार आहोत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्मृती मानधना अन् पलाश मुच्छल पुन्हा एकत्र येणार? व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Wednesday, 8 April 2026, 15:03

झाकीर खान आणि सौरभ द्विवेदीवर प्रेक्षक भडकले! राजपाल यादवच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न; अखेर अभिनेत्याने दिली पहिली प्रतिक्रिया

Wednesday, 8 April 2026, 15:00
Pregnant wife beaten with belt for not fulfilling husband's 'demand' 'Otherwise, I won't let you have sex'

‘नाहीतर तुला नांदवणार नाही’ पतीची ‘ती’ मागणी पूर्ण केली नाही म्हणून गरोदर पत्नीला पट्ट्याने मारहाण

Wednesday, 8 April 2026, 14:58

लव्ह जिहादनंतर आता लँड जिहाद! पुरंदरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा विराट मोर्चा; पाहा काय आहे प्रकरण? वाचा

Wednesday, 8 April 2026, 14:34
Corrupt administration of the Education Board exposed! Divisional president caught red-handed while accepting bribe; "7 percent" commission demanded for the bill

शिक्षण मंडळाचा भ्रष्ट कारभार उघड! विभागीय अध्यक्षांना लाच घेताना रंगेहाथ अटक; बिलासाठी मागितलं “7 टक्के” कमिशन

Wednesday, 8 April 2026, 14:33
Pune Accident

Pune Accident : ऑफिसला निघाली पण मध्येच काळाने घातली झडप, टँकरच्या चाकाखाली चिरडून 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Wednesday, 8 April 2026, 14:20
Next Post

मोठी बातमी : वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार? राजकीय वर्तुळामध्ये चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.