पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या वर्षी इतिहासातील सर्वात मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. गट ब व गट क संवर्गातील सुमारे ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. आयोगाकडून याची जाहिरात शुक्रवारी (ता. २०) संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सदर जागा या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क या संवर्गाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पदांसाठीची पूर्व परिक्षा ३० एप्रिल २०२३ रोजी आयोगाकडून घेण्यात येणार आहे. तर गट ब साठीची मुख्य परिक्षा २ सप्टेंबर २०२३ ला तर गट क साठीची मुख्य परिक्षा ही ९ सप्टेंबरला आयोगाकडून घेण्यात येणार आहे.
दरम्यान, एकूण ८ हजार १६९ पदांकरिता घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपीक, टंकलेखक अशा एकूण ८ हजार १६९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे एमपीएससीकडून सांगण्यात आले.