मुंबई: ग्रामीण महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र (Winner Candidate List) मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. 7,438 उमेदवारांचे भवितव्य आज पेटीतून बाहेर येणार असले तरी, खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेतले आहे ते निकालापूर्वीच जाहीर झालेल्या 25 बिनविरोध जागांनी, विशेषतः कोकणात महायुतीने (भाजप आणि शिंदे शिवसेना) विरोधकांना चितपट केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 50 पैकी 8 जागांवर भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे, तर 100 सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये 17 जागा आधीच खिशात घातल्या आहेत. कणकवली आणि देवगड यांसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये विरोधकांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने महायुतीचा रस्ता मोकळा झाला. या निवडणुकांना ‘मिनी मंत्रालय’ म्हणतात कारण ग्रामीण भागातील विकास निधीचे नियंत्रण येथूनच होते. दरम्यान, कोण बाजी मारणार ते लवकरच कळणार आहे.
बिनविरोध विजयी उमेदवारांची यादी
१. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (8 जागा – भाजप/शिंदे सेना)
खारेपाटण: प्राची इस्वालकर (भाजप), बांदा: प्रमोद कामत (भाजप), जाणवली: रुहिता राजेश तांबे (भाजप पुरस्कृत), पडेल: सुयोगी रवींद्र घाडी (भाजप), बापर्डे: अवनी अमोल तेली (भाजप), पोंगुर्ले: अनुराधा महेश नारकर (भाजप), किंजवडे: सावी गंगाराम लोके (भाजप), कोळपे: प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)
२. पंचायत समिती कणकवली (6 जागा)
वरवडे (सोनू सावंत), नांदगाव (हर्षदा वाळके), जाणवली (महेश्वरी चव्हाण), बिडवाडी (संजना राणे), हरकुळ बुद्रुक (दिव्या पेडणेकर) आणि नाटळ (सायली कृपाळ) – या सहाही जागांवर भाजपने बाजी मारली आहे.
३. पंचायत समिती देवगड (6 जागा)
येथेही पडेल (अंकुश ठूकरूल), नाडण (गणेश राणे), बापर्डे (संजना लाड), फणसगाव (समृद्धी चव्हाण), शिरगाव (शितल तावडे) आणि कोटकामते (ऋतुजा खाजनवाडकर) या जागांवर भाजपचे वर्चस्व राहिले आहे.
४. इतर महत्त्वाचे विजयी उमेदवार
-
कोकिसरे (वैभववाडी): साधना सुधीर नकाशे (भाजप)
-
आसोली (वेंगुर्ले): संकेत धुरी (भाजप)
-
अडवली मालडी (मालवण): सीमा सतीश परुळेकर (भाजप)
-
शेरले (सावंतवाडी): महेश धुरी (भाजप)
-
कोलझर (दोडामार्ग): गणेश प्रसाद गवस (शिंदे शिवसेना)
-
रायगड (महाड): अनिल जाधव (शिंदे शिवसेना)
-
रत्नागिरी (नाणीज): डॉ. पद्मजा कांबळे (शिंदे शिवसेना)
सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. दरम्यान, संपूर्ण निकाल काही वेळात स्पष्ट होईल. दरम्यान, मतदारांचा कौल नेमका कोणच्या बाजूने ते लवकरच कळणार आहे.






