Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, निकालाकडे लक्ष

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 February 2026, 9:57

Satara ZP Election : सातारा : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेसाठी एकूण 65 गटांमध्ये तर 11 पंचायत समित्यांअंतर्गत 130 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. आता या निवडणुकांमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर कोणाची सत्ता येणार, हे काही वेळात स्पष्ट होणार आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी 67.80 टक्के मतदान झाले आहे.

सातारा तालुक्यात 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक झाली असून येथे 62.42 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र आल्याने त्यांना अनुकूल वातावरण असल्याचे बोलले जात आहे. त्यांना मनोज घोरपडे आणि महेश शिंदे यांचा पाठिंबा मिळाला आहे. दुसरीकडे शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीकडेही लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे निवडणूक प्रचार साध्या पद्धतीने पार पडला. मोठ्या प्रचारसभा झाल्या नाहीत. मात्र पदयात्रा, कोपरासभा आणि मतदारांशी थेट संवाद यामुळे राजकीय वातावरण तापले होते.

 

या निवडणुकीत अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांनीही उमेदवारी केली आहे. कराडच्या येळगाव गटातून उदयसिंह पाटील रिंगणात होते, तर त्यांच्या विरोधात आनंदराव पाटील अपक्ष म्हणून उभे होते. औंध गटातून भारती गोरे यांनी निवडणूक लढवली असून त्यांच्यासमोर मनिषा फडतरे यांचे आव्हान आहे. आंधळी गटातून सोनल गोरे यांच्या विरोधात दिपाली जगदाळे मैदानात आहेत.

खटाव गटातून डॉ. प्रिया शिंदे यांनी निवडणूक लढवली असून राष्ट्रवादीचे राहुल पाटील त्यांच्यासमोर आहेत. मंद्रुळकोळे गटात प्राची नरेंद्र पाटील आणि मृणाल पाटील यांच्यात लढत आहे. कोळकी गटातून सह्याद्री कदम आणि जयकुमार शिंदे यांच्यात सामना झाला. बावधन गटातून दिप्ती पिसाळ यांच्या विरोधात ऋतुजा शिंदे उभ्या आहेत. पुसेसावळी गटात तेजस्विनी कदम आणि रिया पिसाळ यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. आता मतमोजणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune ZP Election: पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयानिमित्त कोणताही जल्लोष न करण्याचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.