पेण (रायगड) : अजित पवारांनी अमोल केल्हेंना पाडण्याचं खुल आव्हान दिल्यानंतर आता महाविकास आघाडीनेदेखील दंड थोपटले आहेत. उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेसाठी रायगड दौऱ्यावर आहेत. त्यांची पहिली सभा पेणमध्ये पार पडली. यावेळी गद्दार सुनील तटकरेंना पाडायचं, अशा शब्दात पेणच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
तिकीट देणार नाही सांगाव
चारशे पार म्हणता नितीशकुमार का लागतात? भ्रष्टाचार करून भाजपत या हीच मोदी गॅरेंटी आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. तर, या गद्दारांना पाडावे लागणार, असे श्रीवर्धनमध्ये शरद पवार मला बोलताना म्हटले होते असा खुलासाही त्यांनी केला होता. मी कल्याण दौरा केल्यानंतर मोदी महाराष्ट्र दौऱ्यात घराणेशाहीवर बोलून गेले. घराणेशाहीला विरोध आहेच, पण जी गद्दारांची घराणेशाही आहे, गद्दारी करणारी घराणेशाही आहे त्यांना भाजपने सांगावे, आम्ही तिकीट देणार नाही, घराणेशाही बंद करणार आहे. असेल हिंमत, सुनील तटकरेंना राज्यसभेत, विधानपरिषेदत पाठवणार नाही असे सांगावे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यावरूनही त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. हाच धागा पकडत ठाकरे यांनी अजित पवार यांना दुसऱ्यांदा मिळालेल्या क्लीनचिटवरून हल्लाबोल केला. हेमंत सोरेन यांना अटक आणि अजित पवार यांना क्लिनचीट असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी भाषणातून काढले.