मुंबई : महसूल विभागात मोठ्या असलेल्या कोकण विभागीय आयुक्तपदी डॉ. राजेश देशमुख यांची सोमवारी राज्य शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोकण विभागाला पूर्णवेळ आयुक्त लाभला आहे. राजेश देशमुख हे याआधी आयुक्त, क्रीडा व सेवा या पदावर कार्यरत होते. सध्याच्या पदाचा कार्यभार क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार विकास पानसरे यांच्याकडून त्वरित
स्वीकारावा, असे अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
राज्याचे क्रीडा आयुक्त असलेले देशमुख यांनी पुणे जिल्हाधिकारी, मुंबईतील हाफकिन बायो- फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, यवतमाळ जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणूनही काम केले आहे. पुण्यातील अनेक मोठे प्रकल्प देशमुख यांच्या कार्यकाळात मार्गी लागले होते.